You are currently viewing दोडामार्ग शहर पुन्हा “ट्रॅफिक जाम”

दोडामार्ग शहर पुन्हा “ट्रॅफिक जाम”

आठवडा बाजारात बेशिस्त पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

दोडामार्ग
शहरात वाहातुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर असून आज रविवारी आठवडा बाजार दिवशी खूप काळाने “ट्रॅफिक जाम” पाहावयास मिळाला. दोडामार्ग मधील तीन मुख्य रस्ते निमुळते व त्यात होणारी बेशिस्त पार्किंग यामुळे आठवडा बाजार दिवशी पूर्णपणे जाम झाल्याचे चित्र होते यावेळी सावंतवाडी रोड, आयी रोड, गोवा रोडसह तिराळी रोडमवरही जाम पाहावयास मिळाला.

यावेळी काही स्थानिक लोकांच्या मदतीने वहातुक पोलीस श्री वराडकर यांनी ह्या ट्रॅफिक जाम मधून वाहन चालकांची मुक्तता केली मात्र हा वाहन चालकांना वारंवार होणारा त्रास वाचवण्यासाठी नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + twelve =