ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अधिवेशन वडगाव मावळ येथे आयोजन- डॉ.विजय लाड
वैभववाडी
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते व ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे २०२६ चे राज्य अधिवेशन
शनिवार दिनांक ८ आणि रविवार दिनांक ९ ऑगस्ट,२०२६ रोजी शिवराज पॅलेस, मुंबई पुणे हायवे, वडगाव मावळ पुणे येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी दिली.
वडगाव मावळ पुणे येथे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व पुणे महानगर आणि पुणे जिल्हा शाखा पदाधिकारी यांची सभा संपन्न झाली. यावेळी डॉ.विजय लाड यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे २०२६ चे राज्य अधिवेशन वडगाव मावळ, पुणे येथे आयोजित करण्यात आल्याचे जाहीर केले.
या राज्य अधिवेशनात विभागनिहाय कार्यकर्त्यांना पंचप्राण पुरस्कार व उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच विविध तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, ग्राहक संबंधित पुस्तकांचे प्रकाशन, ग्रंथ प्रदर्शन व विक्री, गटचर्चा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी ज्या भूमीवर ग्राहक चळवळीचे बिजारोपण केले, त्या पुण्यामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य अधिवेशनासाठी राज्यातील कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड, संघटक श्री. सर्जेराव जाधव व सचिव श्री.अरूण वाघमारे यांनी केले आहे.
या राज्य अधिवेशनाची सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभागातील अधिकाधिक प्रतिनिधींनी या अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, संघटक विष्णूप्रसाद दळवी व सचिव संदेश तुळसणकर यांनी केले आहे.
_________________________
*संवाद मीडिया*
*🚘 तुमच्या कुटुंबासाठी स्मार्ट आणि सुरक्षित निवड — Hyundai Exter!*
*✨ स्टाईल, सेफ्टी आणि शानदार मायलेजचा परफेक्ट संगम! ✨*
*Exter ला खास बनवणारी ५ दमदार वैशिष्ट्ये 👇*
*✅ परवडणारी किंमत*
*💰 फक्त ₹5.80 लाखांपासून*
*✅ जबर्दस्त CNG मायलेज*
*⛽ 27.1 किमी/कि.ग्रॅ. पर्यंत मायलेज*
*✅ स्मूथ आणि पॉवरफुल परफॉर्मन्स*
*⚙️ 4 सिलेंडर CNG इंजिनसह दमदार ड्रायव्हिंग अनुभव*
*✅ उच्च दर्जाची सुरक्षा*
*🛡️ 6 एअरबॅग्जसह 30+ स्टँडर्ड आणि 45+ आधुनिक सेफ्टी फीचर्स*
*✅ जास्त लगेज स्पेस*
*🧳 ड्युअल सिलेंडर CNG असूनही भरपूर बूट स्पेस*
*🎁 आजच टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा!*
*🚗 Hyundai Motor Company अधिकृत विक्रेता*
*MAI Hyundai — अविरत सेवेची 27 वर्षे*
*📍 कुडाळ: उद्यमनगर, मुंबई-गोवा हायवे*
*📍 कणकवली: वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागदे*
*📞 संपर्क : 74100 06037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/203812/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
