You are currently viewing जिथे संकट, तेथे सामाजिक बांधिलकी; इन्सुली मेटा येथे रस्त्यावरील झाडे-वेली हटवून वाहतूक सुरळीत

जिथे संकट, तेथे सामाजिक बांधिलकी; इन्सुली मेटा येथे रस्त्यावरील झाडे-वेली हटवून वाहतूक सुरळीत

जिथे संकट, तेथे सामाजिक बांधिलकी; इन्सुली मेटा येथे रस्त्यावरील झाडे-वेली हटवून वाहतूक सुरळीत

सुजय सावंत व लक्ष्मण कदम यांची तत्परता; काही मिनिटांतच मार्ग मोकळा करून नागरिकांना दिलासा

इन्सुली
इन्सुली मेटा परिसरात रविवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास झाडांच्या फांद्या व वेली तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. काही वेली रस्त्याच्या मधोमध लटकत असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती आणि परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रतिष्ठानचे सदस्य सुजय सावंत व लक्ष्मण कदम यांनी तत्परता दाखवत तुटलेल्या फांद्या हटविण्याचे काम हाती घेतले. तसेच डंपरवर चढून रस्त्याच्या मधोमध लटकलेल्या वेलीही तोडून टाकल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही मिनिटांतच रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आणि वाहनधारकांना दिलासा मिळाला.
आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनावरील ताण कमी करण्यासोबतच नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच धावून जाणारी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही संस्था आपल्या सेवाभावी कार्यामुळे चर्चेत असते. नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा अन्य संकटाच्या प्रसंगी संस्थेचे कार्यकर्ते निस्वार्थपणे मदतीसाठी पुढे सरसावत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून तत्काळ मदतकार्य सुरू असून, त्यांच्या या सेवाभावी आणि समाजहिताच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

_________________________
*संवाद मीडिया*

*पावसाळ्यात सांधेदुखी, अंगदुखी, पाठदुखी वाढतेय का? 🤕*

*आजच सहभागी व्हा*
*🌧️ मान्सून पंचकर्म महोत्सव*
*माधवबाग कुडाळ क्लिनिक आयोजित 🌿*

*✅ पूर्ण पंचकर्म उपचार*
*(स्नेहन + स्वेदन + बस्ती)*
*💰 फक्त ₹999/- (~₹2000/-)~*

*🎯 पंचकर्माचे फायदे:*
*✔️ सांधे व स्नायूंना आराम*
*✔️ शरीरशुद्धी*
*✔️ वातदोष नियंत्रण*
*✔️ ताणतणाव कमी*
*✔️ शरीर हलके व ताजेतवाने*

*🎁 सोबत मोफत पावसाळी आयुर्वेदिक रेसिपी पुस्तक*

*👥 फक्त 50 व्यक्तींसाठी मर्यादित*

*शिबिर कालावधी: १ जून ते 30 जून*

*📍 माधवबाग कुडाळ क्लिनिक*

*📞 नाव नोंदणीसाठी: 9371621952*

*⏳ जागा मर्यादित आहेत. आजच आपली नोंदणी करा!*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207580/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा