बांदा
सध्या कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे महिला दिन एकत्रित येऊन साजरा करता येणे अशक्य असले तरी महिला शिक्षिकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुका पातळीवर शिक्षक समिती महिला आघाडीच्या वतीने प्राथमिक महिला शिक्षिकांसाठी online उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत शिक्षिका महिलांनी आपल्या घरातूनच सहभागी व्हावे .
स्पर्धेची नियमावली
१) ही स्पर्धा एकाच गटात होणार असून त्यातून प्रथम तीन व दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढले जातील.
२) स्पर्धेतील सहभागी सर्व स्पर्धकांना संघटनेच्या वतीने आकर्षण प्रमाणपत्र व भेटवस्तू दिली जाईल
२) सहभागी महिलांनी एक मिनिटात जास्तीत जास्त उखाण्यांचे सादरीकरण करावे.
३) उखाण्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करावा.
४) उखाणे सादर करताना व्हिडिओच्या सुरवातीला आपले नाव सांगून एक मिनिटाचा व्हिडिओ तयार करावा
५) व्हिडिओ पाठविण्याची मुदत ८ मार्च २०२१रोजी सकाळी ९.००ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत राहील.
५) आपले व्हिडिओ स्वाती पाटील 9921432838 , रूपाली मर्गज 9403366240 या मोबाईल नंबरवर पाठवावेत.