परशुराम उपरकर यांचा टोला; सर्वसामान्यांना नियम एक व पालकमंत्री यांना नियम वेगळा का?
कणकवली
महसुलमधील कोतवाल ते सर्कलपर्यंत पैसे घेतल्याशिवाय कामे होत नाहीत. दोन-दोन वर्षे हेलपाटे मारावे लागतात. आपल्या मतदारसंघात कोतवालापासून ते सर्कलपर्यंत घडणाऱ्या या प्रकाराबाबत आमदाराना कळायला सात वर्षे लागतात हे अजबच आहे,असा टोला मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी लगावला. एकीकडे कोरोना रोखण्याचा प्रयत्न असताना पालकमंत्री 12 ते 14 गाडय़ा घेऊन उद्घाटन कार्यक्रम करत आहेत. हे प्रशासनाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात नाही का? असा सवाल उपरकर यांनी व्यक्त केला आहे. कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर बोलत होते.
महसुलमधील कोतवाल ते सर्कलपर्यंत पैसे मागितल्याशिवाय कामे होत नाहीत, असे आरोप करणाऱ्या आम. वैभव नाईक यांनी आपला वचक नसल्याचे दाखवून दिले. कुडाळ येथे हायवेच्या विषयात प्रांताधिकारी पैसे मागत असल्याच्या त्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे पुढे आले आहे. मनसे व राष्ट्रवादीने घेतलेल्या माहितीत तेथे फक्त पत्रा शेड होती, असे पुढे आले. याबाबत उपायुक्तानी चौकशीही केली असून संबंधीताला नसलेल्या घराचे पैसे मिळवून देण्यासाठी घडलेला प्रकार हा भ्रष्ट्राचार नव्हे का? असा सवाल आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. जनतेने निवडून दिलेल्या आमदाराला सर्कल, तलाठी सोडाच पण कोतवालही विचारत नाही, असे त्यांच्या वक्तव्यातुन दिसून आले. विनापरवाना वाळू उत्खननात शासनाचा महसुल बुडत होता. विरोधी पक्ष तसेच जनताही वाळूच्या वाढीव दराबाबत आंदोलने करत होती. त्यावेळी हेच तलाठी आणि सर्कल आमदाराना प्रिय होते. कुडाळ येथीलही हायवेच्या विषयात ज्याना पैसे मिळण्यासाठी प्राताधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आला, त्या प्रकरणी आमचे तालुकाध्यक्ष व राष्ट्रवादीनेही माहिती घेतली त्यावेळी तेथे पक्के बधकाम नव्हते, केवळ पत्रा शेड होती, असे पुढे आले आहे. तसेच आरओडब्लूमध्ये त्यांची पक्की इमारत गेलेली नसताना जो प्रकार घडविण्यात आला, तो नेमका काय? आता कोकण विभागीय उपायुक्तानी चौकशी केली असून लवकरच पुढील कार्यवाही कळेल.असेही परशुराम उपरकर म्हणाले.
कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाने 144 कलम लावलेले आहे. तसेच मुख्यमंत्री यांनी कोणत्याही मंत्री यांनी गर्दी करून कार्यक्रम करू नयेत अशा सूचना दिलेल्या आहेत. असे असताना सर्वसामान्य नागरीक, पदाधिकारी यांना नियम एक व पालकमंत्री यांना नियम एक असे आहे का? एकीकडे कोरोना रोखण्याचा प्रयत्न असताना पालकमंत्री 12 ते 14 गाडय़ा घेऊन भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रम करत आहेत. हे प्रशासनाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात नाही का? असे माजी आम.परशुराम उपरकर यांनी सांगितले.