वैद्यकीय अधिकारी पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी ‘वॉक-इन इंटरव्ह्यू’
सिंधुदुर्गनगरी
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे व जिल्हा परिषद दवाखान्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी वॉक-इन इंटरव्ह्यूद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्जाचा नमुना व त्याबाबत संक्षिप्त तपशिल जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर तसेच राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या www.zpsindhudurg.maharashtra.gov.in व https://sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
