You are currently viewing कुडाळ तालुक्यात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन

कुडाळ तालुक्यात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी :- 

कुडाळ तालुक्यातील ओरोस, सुलोचनानगर, घर क्र. 1009 येथे दिनांक 15 सप्टेंबर 2020 पर्यंत रात्री 12.00 पर्यंत कंटेन्मेंट झोन, ओरोस, नवनगर प्राधिकरण, कृषी रत्न बिल्डींग तळमजला, रुम. 2 येथे दिनांक 15 सप्टेंबर 2020 पर्यंत रात्री 12.00 पर्यंत कंटेन्मेंट झोन,  कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी, घर नं. 2162  येथे दिनांक 16 सप्टेंबर 2020 पर्यंत रात्री 12.00 पर्यंत कंटेन्मेंट झोन, कुडाळ शहरातील केळबाईवाडी, घर न. 859 येथे दिनांक 17 सप्टेंबर 2020 पर्यंत रात्री 12.00 पर्यंत कंटेन्मेंट झोन,  कुडाळ शहरातील श्रीरामवाडी, कमल अपार्टमेंट, घर न. 3292/02 येथे दिनांक 17 सप्टेंबर 2020 पर्यंत रात्री 12.00 पर्यंत कंटेन्मेंट झोन, वरील सर्व ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
कुडाळ तालुक्यातील ओरोस, साळगाव, वाडोस, तेर्सेबांबार्डे येथे कंटेन्मेंट झोन
कुडाळ तालुक्यातील ओरोस, सिंध्दार्थनगर घर न. 1539 च्या 50 मीटर परीघात  दिनांक 14 सप्टेंबर 2020 पर्यंत रात्री 12.00 पर्यंत कंटेन्मेंट झोन, ओरोस, आदर्शनगर, नुतन सोसायटी च्या 50 मीटर परीघात दिनांक 15 सप्टेंबर 2020 पर्यंत रात्री 12.00 पर्यंत कंटेन्मेंट झोन, साळगाव, लुभाटवाडी च्या 50 मीटर परीघात दिनांक 16 सप्टेंबर 2020 पर्यंत रात्री 12.00 पर्यंत कंटेन्मेंट झोन, वाडोस, देऊळवाडी, घर नं. 70 च्या 50 मीटर परीघात दिनांक 17 सप्टेंबर 2020 पर्यंत रात्री 12.00 पर्यंत कंटेन्मेंट झोन, तेर्सेबांबार्डे बार्देसकरवाडी च्या 50 मीटर परीघात येथे दिनांक 18 सप्टेंबर 2020 पर्यंत रात्री 12.00 पर्यंत कंटेन्मेंट झोन, वरील सर्व ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये मध्ये वरील तारखांपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा