*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सर आली हो…*
सर आली हो रिमझिम पहिली आली
हास्य ते धरेच्या गाली
ही रिमझिम रिमझिम येते
तृप्त ती धरेला करते
हसू वसुधेला मग येते
बीजबियाणे,पांघरूणात मग घाली..
हास्य ते धरेच्या गाली…
फुलपांखरे भुरूभुरू उडती
भुंगेही गाणे गाती
मधमाशा नर्तन करती
मधुमालती, सुगंधात मग न्हाली…
हास्य ते धरेच्या गाली…
पुष्करिणी त्या फुलवंती
उद्याने फुलांनी डंवरती
ऊनपाऊस खेळ तो चाले
आनंदी चराचर न्हाले
बघा दाटी हो,आभाळी ढगांची झाली
हास्य ते धरेच्या गावी…
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
