You are currently viewing कृषी दिनानिमित्त 1 जुलै रोजी ‘शेतकरी मेळावा’

कृषी दिनानिमित्त 1 जुलै रोजी ‘शेतकरी मेळावा’

कृषी दिनानिमित्त 1 जुलै रोजी ‘शेतकरी मेळावा’

सिंधुदुर्गनगरी

कृषी विभाग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि दिन कार्यक्राच्या अनुषंगाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता भद्रकाली मंदिर शेजारील सभागृह, आंबडपाल येथे आयोजित केला आहे.  या मेळाव्याचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत उपस्थित राहणार आहेत.

           तसेच या कार्यक्रमास लोकसभा सदस्य नारायण राणे, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रमोद जठार, अनिकेत तटकरे, दिपक केसरकर, निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

          जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल कबनुरे-पुंड, वित्त व बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर, ‍शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, महिला व बाल विकास सभापती अनुराधा नारकर, समाज कल्याण समिती सभापती रुहिता तांबे, कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक व आंबडपालचे सरपंच महेश मेस्त्री यांच्या विशेष उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.  तरी या शेतकरी मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दुग्धशाळा विकास समिती उपाध्यक्ष तुकाराम साईल व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा