You are currently viewing भाषण सुरू असतानाच छोट्या मुलांकडून शिवछत्रपतींचा जयजयकार हेच हिंदू संमेलनाचे फलीत – *प्रसन्ना उर्फ बाळू देसाई*

भाषण सुरू असतानाच छोट्या मुलांकडून शिवछत्रपतींचा जयजयकार हेच हिंदू संमेलनाचे फलीत – *प्रसन्ना उर्फ बाळू देसाई*

भाषण सुरू असतानाच छोट्या मुलांकडून शिवछत्रपतींचा जयजयकार हेच हिंदू संमेलनाचे फलीत – *प्रसन्ना उर्फ बाळू देसाई*

वेंगुर्ले

मातोंड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून अमित नाईक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच वैशाली गावडे ताई सनातन संस्था या उपस्थित होत्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक रावजी परब गुरुजी होते.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारत मातेला वंदन करण्यात आले. महिलांच्या पुढाकारातून घेतलेल्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन ग्राम संघाचे अध्यक्षा सौ सीमा परब सीआरपी अनिता परब, वैदेही मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य वैभवी सुजाता सावंत, माजी सरपंच जान्हवी परब, आशाताईं उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपेश परब, प्रास्ताविक श्रीकृष्ण उर्फ राजू परब यांनी केले तर आभार प्रदर्शन रावजी परब यांनी केले. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांचा सन्मान ज्ञानेश्वर केळजी डॉ कांडरकर यांचा सन्मान प्रदिप जबडे यांनी केला.
कुटुंब व्यवस्था या विषयावर अमित नाईक यांनी मार्गदर्शन केले तर बालसंस्कार या विषयावर सौ वैशाली गावडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शाळेकरी मुलांची लक्षणीय उपस्थिती होती. कुटुंब व्यवस्था या विषयाचे मार्गदर्शन सुरू असताना शिवछत्रपतींचा उल्लेख होताच छोट्या मुलांने शिवछत्रपतींचा जय जयकार केला हेच या हिंदू संमेलनाचे फलीत आहे अशी भावना प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला ७० महिला भगिनी उपस्थित होत्या तसेच 50 हिंदुत्ववादी कार्यकर्ते ही सहभागी झाले होते.
याप्रसंगी वक्ते अमित नाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन रावजी परब यांनी सन्मान केला तसेच सौ वैशाली नाईक यांचा सन्मान ग्राम संघाच्या अध्यक्षा सिमा परब यांनी केला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा