You are currently viewing सरपंच संघटनेचे शिष्टमंडळ नारायण राणेंच्या भेटीला

सरपंच संघटनेचे शिष्टमंडळ नारायण राणेंच्या भेटीला

स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा

देवगड | प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी देवगड येथे दिलेल्या भेटीदरम्यान सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन विविध ग्रामपंचायतींसमोरील अडचणी आणि प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष संजय लाड तसेच पडेलचे सरपंच भूषण पोकळे उपस्थित होते.

सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा करत त्या सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याची विनंती खासदार नारायण राणे यांच्याकडे केली. यावेळी विविध स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा