उमरगा :
उमरगा येथील समाज विकास संस्था आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यात अनेक तालुक्यात अनेक गावातील शेतकरी विधवा परित्यक्ता शेतकरी महिलांना विविध प्रकारचे बियाणाची मदत झालेली आहे.
यामध्ये उमरगा तालुक्यातील विविध गावातून 660 महिलांना बियाण्याचं वितरण करण्यात आलं याप्रसंगी इंजिनिअर किसान बाबरे साहेब अमेरिकेत वास्तव्यास असणारे जगदाळे साहेब, समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ, आणिक फायनान्शिअल सर्विसेस मधील कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते..
याप्रसंगी किसन बाबरे माजी इंजिनियर एम एस ई बी, कसगी गावचे सुपुत्र सध्या अमेरिकेत वास्तव्य असणारे गंगाधर जगदाळे, आदर्श गाव व्हताळ गावचे सरपंच यांनी सद्भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी शेती वाचली, शेती पिकली तर इथली समाज व्यवस्था शिस्तीत चालणार आहे. म्हणून इथल्या शेतकऱ्यांसाठी मदत पहिल्यांदा शेतीच्या बांधावर गेली पाहिजे. शेतकरी सुखावला तर समाज सुखावणार आहे. म्हणून सरकार, दानशूर लोक, स्वयंसेवी संस्था या सर्वांनी बळीराजाच्या पाठीशी उभारावं असे आवाहन सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष कार्य केलेले जेष्ठ समाजसेवक भूमिपुत्र वाघ यांनी केले. या बियाणाच्या मदतीसाठी विविध गावातील विधवा, परित्यक्ता महिला सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमाचे नियोजन विजय टाकळे, अफसाना मुल्ला, विद्या मारकड, गोविंद कामले, गणेश टाकळे, ज्ञानेश्वर पाटील, ज्योती राजपूत, सुमित भोसले, अनिल लवटे यांनी केले.
