You are currently viewing राष्ट्रीय लोक अदालत 10 एप्रिल रोजी….

राष्ट्रीय लोक अदालत 10 एप्रिल रोजी….

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने दिनांक 10 एप्रिल 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन सिंधुदुर्ग, सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. या लोक अदालतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर, बँकेची कर्ज वसुली, मोटार अपघात नुकसान भरपाई, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, भूसंपादन,विद्यूत, पाणी देयक व घरपटृी, दिवाणी (भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकुमाचे दावे इत्यादी) प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तरी ज्या पक्षकरांची संवर्गातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांनी आपली प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्याकरिता संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा आणि राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत असे, आवाहन डी.बी.म्हालटकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा