You are currently viewing निवृत्तीवेतनधारकांसाठी 1 जुलैपासून महा-उपलब्धी मोबाईल ॲप सुरू

निवृत्तीवेतनधारकांसाठी 1 जुलैपासून महा-उपलब्धी मोबाईल ॲप सुरू

निवृत्तीवेतनधारकांसाठी 1 जुलैपासून महा-उपलब्धी मोबाईल ॲप सुरू

 सिंधुदुर्गनगरी

राज्यातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित माहिती व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ‘Maha-UPLABDHI’ (महा-उपलब्धी) हे मोबाईल ॲप विकसित केले असून ते 1 जुलै 2026 पासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्‌वारे दिली आहे.

            हे ॲप Android आणि ios या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून निवृत्तीवेतनधारकांना वापरण्यास सुलभ आणि सुरक्षित प्रणाली आहे. ॲपच्या पहिल्या टप्प्यात सन 2024-25 पासून मिळालेल्या मासिक व वार्षिक निवृत्तीवेतनाचा तपशील, तसेच उत्पन्नाचा दाखला पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. निवृत्तीवेतनधारकांना हे दाखले डाउनलोड करून जतन करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच दिनांक 24 ऑगस्ट 2023 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ई-प्राधिकारपत्राची पीडीएफ प्रत, सन 2025-26 चे फॉर्म-16, निवृत्तीवेतनासंदर्भातील विविध शासन निर्णय, नवीन सुविधांची माहिती तसेच महत्त्वाच्या सूचना ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

             ॲपच्या दुसऱ्या टप्प्यात डिजिटल जीवन प्रमाणपत्र आणि ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार मॉड्यूल या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून याबाबत शासन स्तरावरून आदेश निर्गमित होणार आहे.‘महा-उपलब्धी’ ॲपमुळे निवृत्तीवेतनाशी संबंधित माहिती त्वरित, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होणार असून निवृत्तीवेतनधारकांना विविध कागदपत्रे आणि माहिती मिळविण्यासाठी कोषागार कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची पडणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा