You are currently viewing घे भरारी फाउंडेशनतर्फे तालुका स्कूल नं. १ मध्ये वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

घे भरारी फाउंडेशनतर्फे तालुका स्कूल नं. १ मध्ये वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

घे भरारी फाउंडेशनतर्फे तालुका स्कूल नं. १ मध्ये वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

चाफा, जांभूळ, चिकू, काजूसह विविध देशी रोपांची लागवड; विद्यार्थ्यांनी घेतला झाडे जगवण्याचा संकल्प

सावंतवाडी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सावंतवाडी येथील ‘घे भरारी फाउंडेशन’च्या वतीने तालुका स्कूल शाळा क्रमांक १ मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ या गंभीर समस्यांवर वृक्षारोपण हाच प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन फाउंडेशनच्या नूतन अध्यक्षा ज्योती दुधवडकर यांनी यावेळी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना झाडांचे पर्यावरणीय महत्त्व समजावून सांगत वृक्षसंवर्धनासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमादरम्यान शाळेसमोरील मोकळ्या जागेत चाफा, चिकू, जांभूळ, जाम, सुपारी, अशोक आणि काजू आदी विविध देशी व उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण न करता ही रोपे व्यवस्थित वाढवून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थी, शिक्षक आणि घे भरारी फाउंडेशनच्या सभासदांनी संयुक्तपणे स्वीकारली. यावेळी सर्वांनी पर्यावरण रक्षणाचा दृढ संकल्प केला.
या उपक्रमाला शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास घे भरारी फाउंडेशनच्या संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्षा ज्योती दुधवडकर, उपाध्यक्षा मेघना राऊळ, कार्याध्यक्षा रिया रेडीज, सचिव मेघा डुबळे, खजिनदार मेघना साळगावकर तसेच सल्लागार शारदा गुरव उपस्थित होत्या. याशिवाय रेखा कुमटेकर, सलोनी वंजारी, वैष्णवी बांदेकर, संध्या पवार, मनीषा नवांगुळ, दीपा नेवगी आणि समीक्षा मडगावकर यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.

प्रतिक्रिया व्यक्त करा