*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 6 शाळेत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न*
सावंतवाडी
कै. ॲड. श्रीधर सावळाराम पराडकर यांच्या स्मरणार्थ श्री सुधीर पराडकर सामाजिक कार्यकर्ते सावंतवाडी याजकडून कै.श्रीम.लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 6 शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री लोंढे सर, सावंतवाडी नगर परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सन्माननीय श्रीमती दिपाली भालेकर मॅडम, नगरसेवक सन्मा . श्री.देवा सूर्याजी, शिक्षण तज्ञ श्री.दिलीप भालेकर सर, माजी नगरसेवक सन्मा.श्री.संजय पेडणेकर सर ,राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री. संतोष तळवणेकर सर, बजरंगदलाचे पर्यवेक्षक सन्मा.श्री दिनेश गावडे सर,डॉ. कविता पराडकर मॅडम, राजे प्रतिष्ठानचे सन्माननीय श्री शिवा गावडे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सन्मा.श्रीम.समिक्षा खोचरे मॅडम,शाळेचे शिक्षक श्री केशव जाधव, शिक्षिका श्रीम.सायली लांबर व पालक वर्ग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्वच मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना देणगीदार श्री पराडकर कुटुंबियांना धन्यवाद दिले तसेच शाळेच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.शाळेच्या कौतुकास्पद आणि अभिनंदनीय वाटचालीबद्दल बजरंग दलाचे पदाधिकारी श्री.दिनेश गावडे यांनी समाधान व्यक्त करत शाळेस तब्बल पाच हजार रुपयांची देणगी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.दिलीप भालेकर सरांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री.केशव जाधव यांनी केले.
