You are currently viewing आजगाव धाकोरा ग्रामस्थांनी पुकारलेल्या मायनींग विरोधी लढ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा.

आजगाव धाकोरा ग्रामस्थांनी पुकारलेल्या मायनींग विरोधी लढ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा.

*आजगाव धाकोरा ग्रामस्थांनी पुकारलेल्या मायनींग विरोधी लढ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा.*

*मनसे नेते शिरीष सावंत यांची कृती समिती अध्यक्ष श्री अजित नातु यांच्यासोबत फोन वरून चर्चा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची माहिती.*

सिंधुदुर्ग

शासनामार्फत आजगाव, धाकोरा, आरवली,सोनसुरे व आजूबाजूच्या इतर सर्व गावांमध्ये मायनिंगचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या मायनिंग प्रकल्पामुळे आजगाव आणि परिसरातील जवळपास दहा गावे बाधित होणार आहेत. या पूर्ण मायनिंग प्रकल्पास दहा ही गावांचा पूर्णपणे विरोध असून या गावातून 2022 पासून आतापर्यंत अनेक ग्रामसभेद्वारे विरोधात ठराव घेत ग्रामस्थांनी शासनास लेखी स्वरूपात कळवले देखील होते. परंतु गेलं काही दिवसापासून जे एस डब्ल्यू कंपनी मार्फत या दशक्रोशी गावांमध्ये मॅग्नेटिक ड्रोन द्वारे गावाचे प्रमुख म्हणून सरपंचांना कोणतीही पूर्व सूचना न देता सर्वे सुरू केला. ही बाब कृती समितीच्या व ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वे बंद करण्याची विनंती देखील केली होती. परंतु गावाचा विरोध डावलून कंपनीमार्फत ड्रोन सर्वे तसंच सुरू राहिल्यामुळे ग्रामस्थांनी सदरचा सर्वे बंद पडला. यावर प्रशासनाकडून ग्रामस्थांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत पक्षाचे नेते श्री शिरीष सावंत यांच्या सूचनेनुसार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,तालुकाध्यक्ष सनी बागककर, उपतालुकाध्यक्ष महादेव तांडेल, विभाग अध्यक्ष पवन बागायतकर-विनायक फटनाईक यांनी कृती समितीचे अध्यक्ष श्री अजित नातु यांची भेट घेतली व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व गावांच्या सोबत राहून प्रस्तावित मायनिंग प्रकल्प विरोधी लढत आपल्या सोबत राहणार असल्याचे आश्वासन दिले.
पक्षाचे नेते श्री शिरीष सावंत यांनी श्री नातू यांच्याशी फोनवर चर्चा केली व लवकरच सर्व कृती समिती सदस्य तसेच ग्रामस्थांची भेट येणार असल्याचे कळविले असल्याची माहिती मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा