“एक पेड माँ के नाम” अभियानातून मातोंडमध्ये वृक्षारोपण; धर्म संवर्धनासोबत निसर्ग संवर्धनाचा संदेश
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई यांच्या पुढाकाराने हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आगळावेगळा उपक्रम
वेंगुर्ले :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड माँ के नाम” या अभियानाला प्रतिसाद देत मातोंड (ता. वेंगुर्ले) येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना (बाळू) देसाई यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत वृक्षारोपण करून धर्म संवर्धनासोबतच निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला.
हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व मंडळांमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात येत असून “आईसाठी एक झाड लावा” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मातोंडच्या सरपंच सौ. मयुरी वडाचेपाटकर, सोशल मीडिया प्रमुख श्रीकृष्ण (राजू) परब, पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब व राहुल प्रभू, ग्रामपंचायत सदस्या सौ. किशोरी परब व सौ. सुजाता सावंत, वेताळ प्रतिष्ठानचे सचिन परुळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाबुराव खवणेकर सर तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते किशोर परब, अनिल परब, श्रीकांत परब, संतोष सावंत, प्रदीप जबडे, वसंत खाजणेकर, संतोष परब, अविनाश परब आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक आणि धार्मिक जागृतीचा संदेशही प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
