मायनिंगविरोधी ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; मनसेचा इशारा
जनतेचा विरोध डावलून सत्तेच्या जोरावर सर्वेक्षणाचा प्रयत्न; सिंधुदुर्गात ‘कळणे पॅटर्न’ची पुनरावृत्ती होणार का? – कुणाल किनळेकर
सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनसामान्यांचा तीव्र विरोध असतानाही सत्तेच्या जोरावर प्रस्तावित मायनिंग प्रकल्पासाठी सर्वेक्षण राबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच स्वतःच्या गावात होत असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
आजगाव-धाकोरे परिसरात जे.एस.डब्ल्यू. कंपनीकडून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावातील संघर्षमय परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आजगाव व धाकोरे ग्रामस्थांनी ग्रामसभेत बहुमताने मायनिंगविरोधी ठराव मंजूर केले असतानाही सर्वेक्षणाचा प्रयत्न सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी आणि खनिकर्म विभागाला या सर्व घडामोडींची माहिती नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या पाठबळामुळेच बाहेरून येणाऱ्या कंपन्यांना अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्याचे धाडस होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी. प्रस्तावित मायनिंगला त्यांचा पाठिंबा आहे की विरोध, हे जनतेसमोर जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या भाडेवाढीप्रकरणी ज्या पद्धतीने त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन स्थगितीची मागणी केली, त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रस्तावित मायनिंग प्रकल्प रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी म्हटले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यावरण, शेती आणि स्थानिक जनजीवनावर परिणाम करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांविरोधात जनतेने एकजूट दाखविण्याची गरज असल्याचे सांगत किनळेकर यांनी नागरिकांना ‘राखणदार पदयात्रेत’ मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आजगाव-धाकोरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकजुटीचे कौतुक करत, कोणत्याही दडपशाहीला न घाबरता आपला परिसर आणि नैसर्गिक संपत्ती वाचविण्यासाठी संघर्ष सुरू ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या लढ्यात ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
_________________________
*संवाद मीडिया*
*संपूर्ण देशात आणि परदेशात गेली 18 वर्षे हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त
*🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*
– १०० % प्लेसमेंट.
– परदेशात नोकरीच्या संधी.
– ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
– संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
– अनुभवी अध्यापक वर्ग.
👉*(OBC,SBC,NT,SC ,ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
पत्ता – प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी
*📱संपर्क क्रमांक : 9420156771/9145623747/7887561247*
कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
