You are currently viewing माजगाव येथील ‘त्या’ पुलाचा भाजप कडून पुन्हा भूमिपूजन समारंभ….

माजगाव येथील ‘त्या’ पुलाचा भाजप कडून पुन्हा भूमिपूजन समारंभ….

सावंतवाडी
आठ दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी शुभारंभ केलेल्या माजगाव पुल नुतनीकरण कामाचा भाजपच्यावतीने शुक्रवारी सकाळी पुन्हा सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजु परब यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे एकाच कामाचा दोन वेळा दोन राजकीय पक्ष्यानी केलेला शुभारंभ माजगाव परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

यावेळी पंचायत समिती सदस्य बाबु सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, चंद्रकांत सावंत , श्री धुरी , नगरसेवक आनंद नेवगी, माजी सभापती रवी मडगांवकर, भाजपा महिला तालुका अध्यक्षा धनश्री गांवकर, तालुका खजिनदार अजय सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळा वेजरे, श्याम कासार, प्रशांत बुराण भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =