वेंगुर्ला
येथील उभादांडा रहिवासी सॅमसन सेलिस्टीन फर्नांडिस याची महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. राज्याचा हा संघ ५ मार्च रोजी भुवनेश्वर ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेत खेळणार आहे.
वेंगुर्लेतील जय मानसिश्वर हॉलीबॉल संघातून गेली तीन चार वर्षांपासून सॅमसन खेळतो अनेक खुल्या व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये त्याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर संघाला विजेतेपद पटकावून दिले आहे. नुकतीच चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघाची निवड चाचणी झाली भारतीय हॉलीबॉल संघाचे कोच विरत शहा यांच्या निवडसमितीने या निवड चाचणीत महाराष्ट्र राज्य मधील सहभागी ज्या टॉप १२ खेळाडूंची निवड केली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ला येथील सॅमसन फर्नांडिस याचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य हॉलीबॉलसंघ ५ मार्च रोजी भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेत आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार आहे.सॅमसन याच्या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला व युवा मोर्चा सिंधुदुर्ग यांच्याकडून सॅमसन याचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले आहे.