You are currently viewing विश्व मावशी दिवस

विश्व मावशी दिवस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विश्व मावशी दिवस*

 

देऊन उपमा मारक्या म्हशीची

*उगाच केले बदनाम*

मावस बहिणी आम्ही गाईच्या

रंग आमच्या काळा ढोण

१

देव मानून तेहेतीस कोटी

करता पूजा गो मातेची

फुकट करता राग आमचा

पूर्ती करतो दूध गरजेची

२

रस्ता रोखला आज म्हणून

पाळून विश्व मावशी दिवस

अपेक्षा आहे मिळेल मान

गाय आमची बहीण मावस

४

असून आंम्ही दुधाळ पशू

भावनाही आहेत आम्हाला

बंद करून हायवे क्षणभर

इशारा समजा समाजाला

५

जगा जगुया सूत्र आपुले

जपुया नाते *विश्वासाचे*

साजरा करून मावशी डे

नयन उघडतील मानवाचे

६

विनायक जोशी 🖋️ठाणे

मोबाईल/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा