सिंधुदुर्गनगरी येथे डाक अदालत
सिंधुदुर्गनगरी
पोस्ट सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी सिंधुदुर्ग विभागातर्फे दि. १९ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता अधीक्षक डाकघर,सिंधुदुर्गनगरी येथे ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर एन.टी. कुरळपकर यांनी दिली आहे.
देशामधील पोस्टाची सेवा हि सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करुन प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करते. हि सेवा देतांना, संभाषणामध्ये, पत्र व्यवहारामध्ये किंवा सेवेमध्ये काही त्रुटींमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्यायनिवाडा करण्यासाठी पोस्ट खात्यांने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.
पोस्टाच्या कार्यपध्दतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींचे या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट काऊटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारत घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकारयास पाठविली असेल त्यांचे नाव व हुद्दा इत्यादी. संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर एन.टी. कुरळपकर यांचे नावे दिनांक १७ जून २०२६ पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
