You are currently viewing चिंदर-सडेवाडी येथे शेती माल विक्री केंद्राचा शुभारंभ…

चिंदर-सडेवाडी येथे शेती माल विक्री केंद्राचा शुभारंभ…

मालवण

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) यांच्या वतीने विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ चिंदर-सडेवाडी येथे अश्विनीकुमार कांबळी यांच्या स्टॉलवर चिंदर सरपंच सौ राजश्री कोदे यांच्या हस्ते झाला. तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विकेल ते पिकेल अभियानाच्या संकल्पने बाबत सविस्तर माहिती दिली. सौ राजश्री कोदे यांनी कृषी विभागाच्या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे,कृषी पर्यवेक्षक ए.व्हि.गवंडे, कृषी सहा. सुनिल कदम, श्री.एस. जी. परब, श्री.मिथुन खराडे, श्री.एस. डी. शिंदे, आत्मा तालुका व्यवस्थापक निलेश गोसावी , प्रगतशील शेतकरी श्री.सुशांत आसोलकर,श्री.सुनिल धुमडे क्रुषि मित्र व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्री.शिंदे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा