You are currently viewing बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने विज्ञान दिन साजरा…

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने विज्ञान दिन साजरा…

कुडाळ

“कुतूहल हा विज्ञानाचा पाया आहे आणि गरज ही शोधाची जननी आहे जे सामान्यांना दिसत नाही ते शास्त्रज्ञांना दिसते व तेथूनच शोधाची सुरुवात होते त्या शोधाचा अखील जगताला फायदा होतो” असे उद्गार सरंबळ हायस्कूलचे मुख्याध्यापक विवेकानंद बालम यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ तर्फे विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “विज्ञानवादी दृष्टीकोनच अंधश्रद्धेवर मात करू शकतो. विज्ञानातील प्रगती माणसाला अधिकाधिक सुखी जीवनाचा खजिना देऊ शकते. यासाठी बालवयातच वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून- रुजवून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण केली पाहिजे. यादृष्टीने बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल चे प्रयत्न व उपक्रम स्तुत्य आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध वैज्ञानिक मॉडेल्स खरोखरच उत्तम आहेत. असे सांगत या उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्यासपीठावर चेअरमन उमेश गाळवणकर, महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे(मुंबई विभाग) उपाध्यक्ष- श्री. गिरीश चापडे , पालक संघाचे राहुल केंकरे, श्री मंगेश साखळकर, प्रशांत वज्राटकर, सेंट्रल स्कूलच्या उपप्राचार्य प्रियांका सिंग व इतर मान्यवर उपस्थित होते. सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमण परिणाम जगासमोर सादर केला तेव्हापासून हा दिवस विज्ञान दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेली एकूण पस्तीस मॉडेल्स प्रदर्शनासाठी ठेवलेली होती. सॅनिटायझर डिस्पेंसर, कंट्रोल कार, अटेंडन्स सिस्टीम, अर्थक्विक सिस्टीम, रोड युजिंग प्लास्टिक अशी विविध प्रकारची मॉडेल्स विद्यार्थ्यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेली होती. विद्यार्थी व पालक या प्रदर्शनासाठी आवर्जून उपस्थित होते व त्यांनी मुलांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल , गुणवत्तेचे कौतुक करून शाबासकी दिली. उमेश गाळवणकर, प्रा.चेतन प्रभू, पियुषा प्रभूतेंडोलकर, मर्ल फेनसेका, पल्लवी कामत यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षक पवन शिमनगौड, गिरिजा सावंत, रेश्मा घाडिगावकर, पूजा गोसावी, जागृती तोरसकर, यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आलेल्या या विज्ञान दिनाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार ऋचा कशाळीकर हिने मानले. यावेळी सोशल डिस्टन्स चे नियम पाळून विद्यार्थीवर्ग, शिक्षक व पालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा