किती सुंदर
तुझं दिसणं,
तरीही,
हास्य तुझं,
हरवलेलं.
नाजूक बांधा,
रेखीव आकार,
तरीही,
चालणं तुझं,
अवघडलेलं.
रेशमी केस,
हवेशी झोंबती,
तरीही,
यौवन तुझं,
मोहरलेलं.
मनात चांदणं,
डोळ्यात चांदणं,
तरीही,
आभाळ तुझं,
मंतरलेलं.
रेशीम गाठी,
स्वर्गात जुळती,
तरीही,
जीवन तुझं,
फुललेलं….
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६