दोडामार्ग
रविवारी झालेल्या जिलेटिन स्फोट शिरंगे येथील कॉरीतच झाला असून जखमी झालेल्या दोन्ही कामगारांना घटनास्थळावरून सुमारे वीस किलोमीटर लांब मणेरी येथील मुख्य रस्त्यालगत फेकण्याचे दुर्दैवी कृत्य कॉरी मालकाने केले असून झालेला प्रकार उघडकीस न आणता मिटवण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर येत आहे, शिरंगे येथील कॉरी ही धरणाच्या अगदी लगतच असुन महसूल विभागाने मात्र याकडे पूर्णपणे पाठ फिरवली दिसत आहे. जिलेटिनचा स्फोट हा शिरंगे येथील कॉरीतच झाला असून प्रशासनावर दबाव टाकून घटनास्थळ बदलून साटेली-भेडशी येथील भोमवाडी मधील नदी पात्रात झाल्याचा बनाव करत जखमी झालेल्या परप्रांतीय मजुरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार घडताना दिसत आहे तसेच झालेल्या प्रकारात कॉरी मालकावर गुन्हा दाखल करत स्फोटक पदार्थ आला कुठून याची चौकशी करणे गरजेची आहे परंतु असे न करता प्रशासनावर दबाव टाकून घटनास्थळ बदलत झालेली वास्तव घटना बाजूला टाकत प्रशासनावर दबाव टाकत बनाव करण्याचा प्रयत्न केला असून स्फोटक पदार्थ वापरण्यासाठी लागणारी परवानगी आहे की नाही तसेच स्फोट झालेला स्फोटक पदार्थ परप्रांतीय कामगारांकडे आला कसा याची देखील सखोल चौकशी केली नसून, कॉरीत काम करणारे परप्रांतीय मजूरांची नोंद पोलीस स्टेशन वर उपलब्ध नसून घडलेल्या प्रकारात कॉरी मालकावर जो पर्यंत गून्हा दाखल होत नाही तो पर्यंत गप्प बसणार नाही असा इशारा प.स. सदस्य लक्ष्मण (बाळा) नाईक यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.
प्रशासनावर दबाव टाकून बनाव करत दाखवलेल्या घटनास्थळी गेलो असता स्फोटात जखमी झालेले परप्रांतीय कामगार येथील नदी पात्रातून मणेरी येथील मुख्य रस्त्यापर्यंत येऊ शकत नाही,आणि विशेष म्हणजे नदी पात्रातून रस्त्यावर येईपर्यंतचा रस्ता बघितला असता चांगल्या माणसाला वर येईपर्यंत जीव कासावीस होतो,तर स्फोट झालेली गंभीर व्यक्ती वर येऊच शकत नाही,हे संपूर्ण रचलेले नाटक आहे त्या ठिकाणी मिळालेले पुरावे हे सुद्धा बनावट असल्याचे विधान देखिल त्यांनी केले आहे.