You are currently viewing इथे ओशाळला मृत्यू
Oplus_16908288

इथे ओशाळला मृत्यू

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*इथे ओशाळला मृत्यू*

 

 

इथे ओशाळला मृत्यू

तुकविली खाली मान

भयाण त्या मृत्युनेही

देखिला राष्ट्राभिमान.

/1/

वीरपुत्र संभाजी छावा

शिवरायाचा अभिमान

शौर्यधैर्यवान क्रांतीवीर

तो शिवबापुत्र महान.

/2/

रक्तरंजित क्रांतीसूर्य तो

निधड्या छातीने लढला

छळ, संकटावरी मातब्बर

स्वाभिमाने झुंज लढला.

/3/

राष्ट्र, धर्म वाचविणे हेच

ठेवुनि मनी,रक्षणकर्ता

हा संकल्प स्वाभिमानी

संभाजीराजा विघ्नहर्ता

/4/

कर्तृत्व तळपले तेजसूर्यासम

स्वराज्यपाईक शंभूराजानी

राज्यासाठी वाहिले पंचप्राण

असंख्य मरणयातना झेलुनी.

/5/

युगायुगांतरी ही गाथा गाईल

महाराष्ट्राची धरती वीरस्मृतीचे

अत्याचाराचा कहर सोसला

मिळेवरदान ओशाळत्या मृत्युचे.

/6/

 

 

स्वरचित

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

कलाशिक्षिका

विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा