You are currently viewing ॲड. रुपेश पवार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

ॲड. रुपेश पवार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

ठाणे :

ॲड रुपेश पवार लिखित, सिद्धी फ्रेण्ड्स पब्लिकेशन प्रकाशित “निळ्याशा डोहात” कविता संग्रहाचे प्रकाशन, सोमवारी १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, एकवीरा देवी मंदिर आंनद पार्क श्रीरंग सोसायटी, ठाणे येथे होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन सावली सिनिअर सिटीझनस् असोसिएशन, ठाणे यांनी केले आहे तर कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाट्यतुषार संस्थांच्या सौजन्याने केले गेले आहे. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे चे माजी अध्यक्ष व साहित्यिक, प्रकाशक. श्री विद्याधर ठाणेकर आहेत. “निळ्याशा डोहात” या कविता संग्रहातील कवितांचे विशेष सादरीकरण प्रकाशक : साहित्यिक, पत्रकार श्री विनोद पितळे आणि साहित्यिका डॉ. प्रतीक्षा बोर्डे करणार आहेत. ॲड. संध्या म्हसकर पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थितांचे आभार मानणार आहेत. ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन : नाट्यतुषारचे संचालक श्री राजेंद्र गोसावी करणार आहेत. यावेळी सावली सिनिअर सिटीझनस् असोसिएशनचे अध्यक्षा श्रीम. उल्का चव्हाण, सचिव श्रीम. वृषाली पाटणे, श्रीम. प्रिती जाधव, महिला मंडळ अध्यक्षा श्रीम. कुंदा कोटस्थाने, महिला मंडळ उपाध्यक्षा श्रीम. कल्पना पुंड हे सर्व पदाधिकारी व सावली सीनियर सिटीजन मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत.

साहित्यिक, पत्रकार ॲड रुपेश पवार यांचे हे ११ वे पुस्तक आहे. ते गीत, लघुपट, चित्रपट क्षेत्रातही कार्यरत आहेत. रुपेश पवार हे दिव्यांग असुन ते चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

ठाण्यातील सर्व काव्य रसिक श्रोत्यांनी या प्रकाशन सोहळ्यात आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन सावली सिनिअर सिटीझनस् असोसिएशन, ठाणे यांनी केले आहे.

 

नाट्यतुषार

प्रतिक्रिया व्यक्त करा