पूर्णपणे मोफत लसीकरण; खासदार नारायण राणे उचलणार खर्च
सिँधुदुर्गात कोरोना लसीकरण सुरू झाले असून एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटलला लसीकरण केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. या लसीकरण केंद्राचा शुभारंभ उद्या दि. 03 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल येथे मा. जिल्हाधिकारी सौ. के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांच्या उपस्थितीत होणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे हे या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
सदर लसीकरण हे अन्यत्र 250 रुपयात होते. परंतु एस एस पी एम मेडिकल हॉस्पिटल येथे हे लसीकरण पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. याचा सर्व खर्च खासदार नारायण राणे हे उचलणार आहेत.
या शुभारंभ प्रसंगी सर्व पत्रकार मित्रांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. आर एस कुलकर्णी व सौ. अपूर्वा पडते (CEO) यांनी हॉस्पिटलच्या वतीने केले आहे.