*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
(वृत्त अनलज्वाला)
*सुखाचे आगर*
आई माझी निरंतर दुवा उभ्या घराचा
प्रत्येकाचा विचार केला जपत मनाचा
प्रेमळ धागा भावंडांचा जोडत गेली
संस्कारांची शिकवण सारी सहज पेरली
तिची शिदोरी त्या प्रेमाची सारे जपती
आईसाठी लेकी साऱ्या धावत येती
सार सत्वही जिच्या ठिकाणी भरले असती
तिच्यापुढे मग वितर्क सारे व्यर्थ वाटती
सर्व सुखाचे आगर तिजला उपमा नाही
सांग कोणत्या मुशीतून ही घडली आई
दिधला तिजला आधार सुखे ती असताना
ओकेबोके वाटे घरटे ती नसताना
कशास गाऊ आजच केवळ गुण अन् कीर्ती
मी तर जपते रोजच हृदयी प्रेमळ मूर्ती
©️®️डॉ मानसी पाटील
