सावंतवाडी
गाडीवरील ताबा सुटल्यामुळे माजगाव येथे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला आदळून अपघात झाला. एअर बॅग तात्काळ फुटल्यामुळे सुदैवाने आत मधून प्रवास करणारी महिला बचावली.
ही घटना आज साडेआठ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी मळेवाड मार्गावर येथील पंचम नगर परिसरात घडली.
संबंधित महिला ही बँक अधिकारी असल्याचे समजते सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झाली नाही गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
