*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*लक्ष ठेवायच लांडग्यावर*
करावे आपुले कर्म आधी
येणारी बला नाही टळत
असो राम “तो कोठलाही”
अभय नाही “देऊ शकत”
1
चिमुरडी अवघी 4 वर्षाची
आला नाही *कुठला राम*
मरण लिहीलेल शेणाखाली
मारून सटकला नमक हराम
2
कर्म करायचे फक्त चांगले
रामाला करूदे *आराम*
लक्ष ठेवले आपण जरी
नाही करायचा रस्ता जाम
3
संघटना सा-या वाटलेल्या
बुडून गेलेल्या स्वार्थामधी
असेल जेव्हा वेळ सोईची
छाती पीटतील येऊन मधी
4
नाही टाकायची जबाबदारी
आपणच निर्मिल्या रामावर
जपायची आपली नातवंडे
लक्ष ठेवायच “लांडग्यावर”
5
विनायक जोशी 🖋️ठाणे
मोबाईल/9324324157
