You are currently viewing पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेची घोषणा

पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेची घोषणा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर):

जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक कवी महासंघ आणि अन्याय विरुद्ध लढणारे पुरोगामी विचारांचे ‘झुंजार लेखणी’ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ‘मूकनायक’ या उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळा लवकरच सुरू होणार आहे. या उपक्रमाद्वारे इच्छुकांना पत्रकारितेचे सर्वंकष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक व सल्लागार म्हणून ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक-राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, वरिष्ठ पत्रकार व विश्लेषक प्रतिमा जोशी, प्रा. हेमंत सामंत, दिवाकर शेजवळ, अनिल गलगली, विलास बडे आणि सुरज भोईर मार्गदर्शन करणार आहेत. विविध मान्यवर व तज्ञांच्या सहभागातून पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे.

या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये पत्रकारिता म्हणजे काय, पत्रकारांचे नीतिमूल्ये, कर्तव्य आणि व्यक्तिमत्त्व विकास, कॅमेरा कौशल्य कसे विकसित करावे, आशयलेखनाचे महत्त्व आणि पद्धती, बातमी कशी तयार करावी व लेखन कसे करावे, सामाजिक, राजकीय आणि शोध पत्रकारिता, गुन्हेगारी व छायाचित्रण पत्रकारिता, मुलाखत तंत्र तसेच मुद्रित माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम यांची ओळख यांसारख्या विषयांचा समावेश आहे. वर्तमानपत्र नोंदणी प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या आयोजनात संतोष आंबेकर, मोहन जाधव, दिलीप नारद, डॉ. प्रभाकर कांबळे, गुरुदत्त वाकदेकर, मनीषा मांढरे, संतोष खरटमोल, सूर्यकांत चव्हाण, कल्पना शिंदे, मुकुंद कांबळे, ॲड. सोपान बुडबाडकर, विनायक जवळेकर, राजेश जाधव, घनश्याम आंबोकर, सुरेश साळवी, ॲड. आसिफ शेख, निशा जाधव, साई रामपूरकर, अमेय भोसले, विजय केदासे, विजय भोसले, ॲड. किरण म्हात्रे, तानाजी फणसे, डॉ. संतोष कांबळे, विनोद हिवाळे, विकास कदम, प्रा. सुभाष जाधव आणि संतोष तांबे यांचा सहभाग आहे.

मैत्री संस्था, सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती, माणुसकी फाउंडेशन आणि मराठी साहित्य व कला सेवा यांचे विशेष योगदान या उपक्रमाला लाभले आहे. कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित ठेवण्यात आला आहे. इच्छुकांनी ९९६९६ ८६०१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा