You are currently viewing प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांची संस्कार शिबिराला देणगी 

प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांची संस्कार शिबिराला देणगी 

अमरावती :

येत्या 16 मे ते 22 मे या सात दिवसाच्या विदर्भातील अमरावतीच्या परतवाडा रोडवरील सिकची रिसॉर्टमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरासाठी अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र व पुणे येथील येथे स्थायिक झालेले प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ 25 हजार रुपयाची देणगी दिली आहे. प्राचार्य रामदास चवरे हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मु-हा या गावचे रहिवासी असून अतिशय विपरीत परिस्थिती मधून त्यांनी स्थानिक शासकीय विदर्भ महाविद्यालयातून आपल्या शिक्षण पूर्ण केले आहे.

सुरुवातीला डॉ.पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेत त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्य केल्यानंतर यवतमाळच्या सुप्रसिद्ध दाते महाविद्यालयामध्ये ते प्राचार्य म्हणून झाले. त्यानंतर पुणे येथील महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून ते सेवानिवृत्त झाले. ते सुप्रसिद्ध लेखक असून त्यांनी आतापर्यंत 30 च्या जवळपास पुस्तके लिहिलेली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी लिहिलेली गाणी सुप्रसिद्ध गायक श्री सुरेश वाडकर रवींद्र साठे गझल गंधर्व श्री सुधाकर कदम यांनी गायलेली आहेत. श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या व इतर विद्यापीठात त्यांनी विविध समित्यांवर काम केले आहे. एक संशोधक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे .त्यांनी लिहिलेली पुस्तके आज विविध विद्यापीठात अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून वापरली जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कलाली बोलीचा शब्दकोश तयार केला असून सुप्रसिद्ध साहित्यिक व कोसलाकार श्री भालचंद्र नेमाडे यांनी या शब्दकोशाबद्दल त्यांचे अभिनंदनही केले आहे. कलाली बोरीतील त्यांचा व्यासंग दांडगा आहे.

 

ठीक ठिकाणी त्यांना त्यांनी विविध विषयावर व्याख्याने दिली असून सिकची रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरामध्ये त्यांचा सत्कारही आयोजित करण्यात आला आहे. आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी खूप कष्ट केले यानंतरच्याही पिढीला सुसंस्कार चांगले झाले तर ती समर्थपणे आपल्या तयार राहतील अशी भावना त्यांनी ही देणगी देताना व्यक्त केली आहे. त्यांच्या ह्या देणगीबद्दल मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे व श्री प्रेम किशोर शिकची चॅरिटेबल ट्रस्टचे श्री सचिन माळकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा