You are currently viewing पारिजात साहित्य समूहाचे दुसरे साहित्य संमेलन रंगणार १७ मे रोजी नवी मुंबईत

पारिजात साहित्य समूहाचे दुसरे साहित्य संमेलन रंगणार १७ मे रोजी नवी मुंबईत

नवी मुंबई:

साहित्यिकांच्या सहकार्याने आणि प्रेमाने फुललेला साहित्य समूह अशी ओळख असणाऱ्या पारिजात साहित्य समूहाचे दुसरे साहित्य संमेलन रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी केमिस्ट भवन, सेक्टर ८, सानपाडा (पश्चिम), नवी मुंबई येथे सकाळी ९.०० ते ५.०० या वेळेत पार पडणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ गझलकार डॉ.अविनाश सांगोलेकर भूषविणार आहेत. संमेलनाचे उद्घाटक आहेत ज्येष्ठ गझलकार डॉ. इक्बाल मिन्ने आणि स्वागताध्यक्ष आहेत नवी मुंबई केमिस्ट संघटनेचे सचिव श्री सुनील छाजेड. यावेळी संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख उपस्थित राहणार असून कथा कादंबरीकार सौ. राजश्री भावार्थी, डॉ.अशोक पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. पारिजातकरांनी या संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन समूह प्रशासक तथा निमंत्रक प्रा. एस. यु. मुल्ला व संचालिका शबाना मुल्ला यांनी केले आहे.

या साहित्य संमेलनात निमंत्रितांची मैफिल, साहित्यिक चर्चासत्र आणि २१ नवीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा होणार आहे. यावेळी समूहातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या साहित्यिकांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा