*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पळस फुले बहरली*
चैतन्याच्या रंगात
पळस फुले बहरली
राजबिंड्या पळसाने
सृष्टी रंगात रंगली
बहरला कुसुमांचा
हिरवागार गालिचा
निर्विकार निरंतर
मार्ग असा क्षितीजाचा
दृश्य गाभारी मनीच्या
दिव्यस्वप्न पाझरले
लेखणीच्या सहाय्याने
पळसाला सजविले
चराचरी मुग्ध चैतन्य
तेज चौफेर उधळले
सप्तरंगी उधळण
अंतरंगी जपलेले
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक
