You are currently viewing विज्ञानामुळेच मानवी जीवनाचा कायपालय –  प्रा. दिलीप शितोळे…

विज्ञानामुळेच मानवी जीवनाचा कायपालय – प्रा. दिलीप शितोळे…

वेंगुर्ला येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

वेंगुर्ला

विज्ञानाने आत्तापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे शोध लावले. त्यामुळे मानवी जीवनाला गती मिळाली. याच विज्ञानामुळे मानवी जीवनाचा कायापालट झाला. विज्ञानाच्या शोधामुळे मानव आपले संरक्षण करु लागला. आज आपल्याला मिळणाऱ्या सुखसोयी आणि झालेला विकास फक्त आणि फक्त विज्ञानामुळेच झाला आहे, असे मत विज्ञान विभागाचे प्रा. दिलीप शितोळे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले. वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रा.शितोळे बोलत होते. शितोळे म्हणाले, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना, देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी, विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार मिळवलेले डॉ. सी. व्ही. रमन यांच्या सन्मानार्थ त्यांनी ज्या दिवशी त्यांचा शोध निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर‘ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि त्यांना पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला तो दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जात आहे, असे शितोळे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा