You are currently viewing सरे मी उरे तू

सरे मी उरे तू

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ मालवणी साहित्यिक विनय सौदागर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सरे मी उरे तू*

 

कसे समजू, समजावू मनाला

तुझी साथ नाही, नव्हती जीवा

कुठे पाश असती, कसे फास बसती

उरे तेलवाती मिटतो दिवा

 

कुणा दोष देऊ, कुणा माफिनामा

नसे हाती या ना दिसे डोळीया

पुरे पुरे झाले, तरीही उरे गं

नसे सर्व संपे कधी काळी या

 

असो जे असे ते, फसो मन तसे ते

नसो सुख नसो सावलीही जरा

मला आठवांच्या बुडू दे समुद्री

जिथे राहतो तेथ आहे बरा

 

सरे कर्पूर आरतीचा परी तेथ

उरे काजळी काळजीच्या परी

नको ते मला उरण्याचे कसब गं

सरे मी उरे तू काळ तैसे करी

 

*विनय वामन सौदागर*

आजगाव, सावंतवाडी.

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा