मुंबई :
लतीफ खान यांची सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन त्यांना लोकराजा सामाजिक संघटनेतर्फे ठाण्यातील शासकीय विश्राम गृहात सोमवार दिनांक २७ एप्रिल रोजी कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष पदावर नियुक्ती देण्यात आली.
लतीफ यांनी सामाजिक सेवाभावी कार्यात कायम प्रामाणिकपणे कार्य करून सर्वसामान्य जनतेतील प्रत्येक व्यक्तीला मदत करून त्यांना न्याय हक्क देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
लोकराजा सामाजिक संघटना ही कायम तळागाळातील लोकांसाठी कार्य करत असते. हे कार्य करत असताना अनेक सामाजिक सेवाभावी व्यक्तींना आपल्या संघटनेत जोडण्याचा प्रयत्न करत असते. त्यातून जनहित जोपासले जावे. हे उद्दिष्ट लोकराजा डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्ते.
याचमुळे सामाजिक कार्यकर्ते लतीफ खान यांना लोकराजा सामाजिक संघटनेने “कळवा मुंब्रा” विधानसभा अध्यक्ष पद देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
गेल्या सात आठ वर्षापासून लोकराजा सामाजिक संघटनेचे आयु.भुजंगराव सोनकांबळे मोठ्या प्रमाणात संघटना बांधणी चे कार्य करत आहेत. समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही लोकराजा संघटना आहे. या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष आयु.भुजंगराव सोनकांबळे यांच्यासमवेत समाजसेवक विकास गायकवाड, पञकार अमित अस्थाना उपस्थित होते.
रुपेश पवार
पत्रकार 9930852165
