You are currently viewing दारिद्रय रेषेखालील जेष्ठांना आमदार नितेश राणे देणार मोफत कोरोना लस

दारिद्रय रेषेखालील जेष्ठांना आमदार नितेश राणे देणार मोफत कोरोना लस

मतदार संघातील जनतेसाठी आमदार नितेश राणे यांची मोठी घोषणा

ग्रामीण भागातून लसीकरणाला ये-जा करण्यासाठी सज्ज ठेवल्या मिनी बस

जनतेला कोरोना लस मोफत देणारे नितेश राणे ठरले पहिले आमदार

कणकवली
आमदार नितेश राणे यांनी कोरोना लस देण्या संदर्भात फार मोठी घोषणा केली आहे.कणकवली, देवगड, वैभवाडी या आपल्या मतदार संघातील दारिद्रय रेषेखालील ६० वर्षावरील जेष्ठांना दिल्या जाणाऱ्या लसीची संपूर्ण रक्कम आमदार नितेश राणे स्वतः भरणार आहेत. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातून लसीकरणासाठी या जेष्ठांना रुग्णालयात ये-जा करण्याचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून तिन्ही तालुक्यातुन मिनीबस सज्ज ठेवल्या जाणार आहेत. अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर वरून केली आहे.
आज १ मार्च पासून जेष्ठांना कोरोना लस दिली जाणार आहे. या एका लस साठी २५०रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी दारिद्र्य रेषेखालील जेष्ठांच्या लसीची रक्कम स्वतःच्या खिशातून भरून ही लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा पद्धतीने मोफत लस देणाऱ्यामंध्ये आमदार नितेश राणे हे पहिले आमदार ठरले आहेत.
आमदार नितेश राणे हे आपल्या मतदारसंघात सातत्याने जनसेवेचे उपक्रम राबवितात.कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या लोकांना धान्याची कोठारे राणे कुटुंबाने खुली केली होती. रोगप्रतिकारक औषधे,पीपीई किट,मास्क,वाटप करून जनतेची काळजी आम.नितेश राणे यांनी घेतली होती.स्वयंरोजगार निर्माण करून देत असतांनाच हळद बियाणे मोफत वाटून आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखविला होता.आता समाज कोरोना मुक्त करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काम करत असतांनाच या कार्यात आपला खारीचा वाटा म्हणून मतदार संघातील
दारिद्रय रेषेखालील ६० वर्षावरील जेष्ठांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा