सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या सोहम चौधरीचे JEE परीक्षेत घवघवीत यश; ‘ॲडव्हान्स’साठी पात्र
सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा इयत्ता १२ वीचा विद्यार्थी सोहम चौधरी याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (NTA) आयोजित ‘JEE मेन्स’ परीक्षेत ९२.५६ पर्सेंटाइल मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर सोहम आता ‘JEE ॲडव्हान्स’ परीक्षेसाठी पात्र ठरला असून, JEE Advance परीक्षा देऊन तो आयआयटी (IIT) सारख्या देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवू शकेल.
सोहमच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रवासात त्याला सैनिक स्कूलच्या शिक्षक आणि प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सोहमच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुनील राऊळ, सचिव जॉय डॉन्टस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे तसेच संचालक मंडळ आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. सोहमच्या पुढील वाटचालीस आणि ‘JEE ॲडव्हान्स’ परीक्षेसाठी शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
