दुचाकीला बाजू देताना घडली घटना; जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविले…
कणकवली
समोरून येणाऱ्या दुचाकीला बाजू देत असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला कलंडली.या अपघातात कारमधील नऊ जण जखमी झाले असून यातील काहींना गंभीर दुखापत झाली आहे. तर गाडीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हा अपघात आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कणकवली-कनेडी राज्यमार्गावर हरकुळ बुद्रुक येथे घडला. दरम्यान जखमींना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघात ग्रस्त कारही हरकुळ-बुद्रुक येथून कणकवलीच्या दिशेने येत होती. दरम्यान समोरून येणाऱ्या दुचाकीला बाजू देत असताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. या अपघातात नऊ जण जखमी झाले आहेत. दरम्यान त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले आहे.