You are currently viewing उध्वस्त क्षितिज
Oplus_16908288

उध्वस्त क्षितिज

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*उध्वस्त क्षितिज*

 

क्षितिज आता पार थकले आहे

पाहुनि अग्निकल्लोळ धुमसता

होमकुन्डात बळींचा खच पाहुनि

तेच विसरले स्वसीमेचा रस्ता.

/1/

माणुसकी फक्त शब्दात राहिली

मानवी मुल्ये ती साफ विसरली

एकीकडे उभरती नवे उंच मनोरे

दुसरीकडे गरीबी धरेवर कोसळली.

/2/

मानवता तर दूर कुठे हरवून गेली

भीषण संहार चालला धरेवरती

दानवता तर जाते नित्य पोसली

सामुद्रधुनीज्वाला आकाशीझेपघेती.

/3/

नव्या त्वेषाने लढते आहे स्वार्थासाठी

कोण कुणाचे या जगी उरले नाही

शस्त्रांअस्त्रांच्या आहुतित होम जळे

शास्त्रविधीचे होमकुन्ड विझून जाई.

/4/

मानवी रक्ताळलेल्या स्पर्शाने मनी

अस्वस्थ वसुन्धरा रडते आहे,आकाश

ज्वालेच्या काळोख्या धुरात गुदमरते

क्रुरत्व खेळीत सामुद्रधुनी होई हताश.

/5/

लालकाळ्या आकाशी गिधाडी थवे

अण्वस्त्रांच्या भयाण धूमधडाक्याने

थरकापे समुद्र,विस्मृतीत जलतत्वे

राक्षसीवृत्ती बोकाळे पिसाट स्वार्थाने.

/6/

आनंदे विहरणे, जगण्याचे नाव नको,

मरणाची ललकारी कधीही येई कानी

धर्मशास्त्र,वेदांत सारेबांधूनठेवूबासनी

उध्वस्तेचादरारा घुसमटे क्षितिज मनी.

/7/

 

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

कलाशिक्षिका.

प्रतिक्रिया व्यक्त करा