You are currently viewing कुडाळ येथे जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन

कुडाळ येथे जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन

*कुडाळ येथे जिल्हास्तरीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन*

*विविध विषयांवर होणार मार्गदर्शन*

*ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन*

वैभववाडी

ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते
यांच्यासाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा गुरूवार दिनांक २३ एप्रिल रोजी संस्थेचे राज्य सचिव श्री.अरूण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली
आयोजित करण्यात आली असून जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.विजय सहारे उद्घाटक आहेत.
महावितरण सिंधुदुर्गचे अधिक्षक अभियंता
श्री. अभिमन्यू राख आणि कुडाळचे तहसिलदार श्री.सचिन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
संस्थेचे राज्य संघटक श्री. सर्जेराव जाधव, कोषाध्यक्ष श्रीम. सुनिता राजेघाटगे, सहसचिव प्रा. सुरेश पाटील, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे माजी अध्यक्ष श्री.कमलाकात कुबल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यशाळेत सर्जेराव जाधव-शेतकरी ग्राहक प्रबोधन, प्रा.सुरेश पाटील- ग्राहक पंचायतीची रचना व कार्यपद्धती, श्रीम. सुनिता राजेघाटगे- संस्था निधी संकलन व विनियोग, श्रीम. श्रद्धा कदम- सजग विद्यार्थी ग्राहक अभियान,
श्री.कमलाकांत कुबल व श्रीम. वफा खान- जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यपद्धती व सायबर गुन्हे शाखा यांच्या वतीने सायबर सुरंक्षा या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. सदर कार्यशाळा गुरूवार दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत मराठा समाज हॅाल, कुडाळ हायस्कूल शेजारी, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड, जिल्हा अध्यक्ष प्रा.सुरेश पाटील व कुडाळ तालुका अध्यक्ष श्री. प्रदिप शिंदे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा