You are currently viewing चला मित्रहो…

चला मित्रहो…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूह सदस्य व अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम बालगीत*

 

*”चला मित्रहो…”*

 

चला मित्रहो खेळ खेळुया

मैदानावर सारे जमुया ||धृ||

 

पकडा पकडी खेळ खेळुया

धावून धावून दमून जाऊया

थोडं थांबूया पुन्हा धावूया

चला मित्रहो खेळ खेळुया ||१||

 

विटी दांडूचा खेळ मांडूया

दांडूने विटीला दूर पेलूया

उंच उडाली विटी झेलूया

चला मित्रहो खेळ खेळुया ||२||

 

गोलाकार वर्तुळ आखूया

गुट्टीने गुट्टीला नेम धरूया

बाद दिल्यास मान्य करूया

चला मित्रहो खेळ खेळुया ||३||

 

हारजीत विसरून जाऊया

गळ्यात गळे पण मिळवूया

लोळले कपडे जरा झाडूया

चला मित्रहो खेळ खेळुया ||४||

 

©दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा