You are currently viewing आखाजी उनी आखाजी उनी
Oplus_16908288

आखाजी उनी आखाजी उनी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अहिराणी भाषेतील अप्रतिम काव्यरचना*

 

*आखाजी उनी आखाजी उनी…*

 

आखाजी उनी आखाजी उनी चाल माय माहेर जाऊत

भाऊ मना कसा भवजाई कशी मायबापना तपास

लेऊत..

 

माय मनी व्हती चतुर भारी

बापले सल्ला दिसनी तारी

गावम्हा वजन दोन्हीस्न व्हतं भ्याईस्नी समदा ऱ्हायेत

आखाजी उनी आखाजी उनी….

 

भाऊ मना शिकेल व्हयना वकील

करे तो न्याय नि निवाडा

याद माले येतस काका नि चुलता

आम्हना तो व्हता गोल वाडा

सिय्या नि कुल्लाया समदासन्या एकदम वाडाम्हा

आम्ही करूत..

आखाजी उनी आखाजी उनी…

 

वाडा नि गयी रया हो आते

वयखनं कोनीज लागेना

पांगी गयी समदी नवीन पिढी

मंमई पुनाले पयनात

घरदार सोडी नि गावले टाईन

सयरना पाईक व्हयनात..

आखाजी उनी आखाजी उनी..

 

याद येस भारी आखाजीना झोका

रशी ना दरवय फिरसं

पुरननी पोई खीर नि भात

गौराई मनम्हां बयंस

माहेरना घरले लागनं कुलूप

सुनाट घरे त्या हुईग्यात

आखाजी उनी आखाजी उनी…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा