राजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले शिबिराचे उद्घाटन
सावंतवाडी
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व अथायु मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन राजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, मुत्र व किडनी विकार, कॅन्सर, इत्यादी अनेक आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे. यावेळी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, डॉक्टर्स उपस्थित होते. यावेळी तपासणी शिबिरासाठी मोठ्या संख्येने रुग्णांनी उपस्थिती दर्शवली आहे.