You are currently viewing SBI चे 44 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलवर SMS आल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…

SBI चे 44 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलवर SMS आल्यास त्वरित करा हे काम, अन्यथा…

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने UPI च्या 44 कोटींहून अधिक ग्राहकांना फसवणुकीचा इशारा दिलाय. एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून ग्राहकांना इशारा दिलाय. UPI मार्फत खात्यातून पैसे डेबिट करण्याचा एसएमएस अलर्ट तुम्हाला मिळाला नसेल तर सावध राहा, असेही बँकेने सांगितले. SBI च्या सूचनांचे पालन करा आणि सावधगिरी बाळगा. SBI ने ट्विट करून आपल्या लाखो ग्राहकांना सतर्क केलेय.

 

 

 

बँक म्हणाली, जर यूपीआय व्यवहार तुमच्याकडून झालेला नसेल आणि पैशांच्या डेबिटसाठी तुम्हाला एसएमएस मिळाला असेल तर प्रथम यूपीआय सेवा बंद करा. यूपीआय सेवा बंद करण्यासंबंधी बँकेनं माहिती दिलीय. ऑनलाईन फसवणुकीची वाढती प्रकरणं लक्षात घेता एसबीआय वेळोवेळी ग्राहकांना सतर्क करत असते. यापूर्वी बँकेने ग्राहकांना त्वरित कर्ज अ‍ॅपसाठी सतर्क केले होते. कोणतीही कागदपत्रं न घेता आपल्याला फक्त दोन मिनिटांत कर्ज उपलब्ध करून देण्याचा दावा करणारा कोणतेही त्वरित कर्ज अॅप टाळा. बऱ्याचदा लोक या प्रकारे कर्ज घेतात, परंतु नंतर त्यांना मोठा व्याजदर द्यावा लागतो.

 

UPI सेवा बंद करण्याच्या सूचना बँकेने दिल्यात. टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1800111109 वर कॉल करून ग्राहक यूपीआय सेवा थांबवू शकतात किंवा आपण आयव्हीआर नंबर 1800-425-3800 / 1800-11-2211 वर देखील कॉल करू शकता. या व्यतिरिक्त आपण https://cms.onlinesbi.sbi.com/cms/ वर आपली तक्रार नोंदवू शकता. तिथेच 9223008333 या क्रमांकावर एसएमएस पाठविला जाऊ शकतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा