You are currently viewing वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी ची नोंदणी करण्याचे आवाहन

वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी ची नोंदणी करण्याचे आवाहन

वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी ची नोंदणी करण्याचे आवाहन

 

सिंधुदुर्गनगरी 

 वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी नागरी सुविधा केंद्र मार्फत (CSC) राज्यभर सीएस नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तरी वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी ची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांनी केले आहे.

राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार अॅग्रीस्टॅक (AgriStack)  योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी Farmer ID फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे.

वन हक्क अधिनियम 2006 अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वन जमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वन पट्टा धारक शेतकऱ्यांनी आपल्याजवळील नागरी सुविधा केंद्र( CSC) सीएससी येथे भेट देऊन आवश्यक कागदपत्रांसह फार्मर आयडी नोंदणी करून घ्यावी, या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.  फार्मर आयडी नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कृषी विभागाचे विविध योजनाअनुदानपिक विमानैसर्गिक आपत्ती सहाय्य तसेच इतर डिजिटल कृषी सेवांचा लाभ सुलभपणे मिळण्यास मदत होणार आहे. अशी माहिती जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा